#Yavat बिबट्याच्या दहशतीखाली दौंडचा ग्रामीण भाग


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दि१८ नोव्हेंबर  रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका यांच्या तर्फे वनविभाग कार्यालय दौंड  यांना  निवेदन देण्यात आले.

दौंड तालुक्यामधील व परिसरामध्ये बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे परिसरातील जनता दहशतीखाली आली आहे, परिसरामध्ये बिबट्याच्या वावरा वाढल्या मुळे जनतेचे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक व शारीरिक नुकसान होत आहे. यामध्ये नागरिकांच्या पशुधनाची हानी पण खूप मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत झालेले आहे,
तसेच बिबट्याने कालच दौंड तालुक्यातील बोरीपारधी या ठिकाणी एका अडीच महिन्याच्या लहान मुलावरती हल्ला केला त्यात त्या बाळाला जीव गमवावा लागला याची दखल घेऊन नागरिकां मध्ये संतापाची लाट पसरत चालली आहे सर्व सामान्य लोकांनी  वन विभागाला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे, शाळेमध्ये जाणारी लहान मुले मोठ्या दहशतीमध्ये आहेत त्याचबरोबर शेतामध्ये जाणारे मजुरी करणारे शेतकरी व महिलावर्ग खूप मोठ्या दहशती खाली जगत आहे.

या सर्व बाबींची कल्पना वारंवार वनविभागाला देऊनही कुठल्याही प्रकारची तरतूद वनविभाग करताना दिसून येत नाही यामध्ये प्रामुख्याने दौंड तालुक्यामधील बोरी पारधी, केडगाव, नांनगाव, कानगाव, कडेठाण, हातोळण, जाणाईमाळा वरवंड, पाटस व अन्य गावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बिबट्याचा वावर वाढलेला आहे तरी या घटनेची लवकरात लवकर दखल घेऊन येत्या ८ दिवसांमध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी अन्यथा आठ दिवसानंतर वन विभागाच्या कार्यालयासमोर संपूर्ण दौंड तालुक्यातील लहान मुले, महिला, पुरुष, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक हे बेमुदत उपोषण करतील याची नोंद वन विभागाने घ्यावी तसेच पुढील होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही वन विभागाची असेल अशा प्रकारचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी मराठा महासंघाचे दौंड तालुका युवक अध्यक्ष गणेश दिवेकर,प्रशांत तडगे,तुषार शेळके,विकास शितोळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत