#Chiplun धामापूर जिल्हा परिषद गटात 'रात्रीस खेळ चाले' नागरिकांना खुलेआम पैसे वाटपाची जोरदार चर्चा


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात निवडणुकीला जोर धरला आहे. आमदार शेखर निकम यांचे आपल्या मतदार संघावर असलेले प्रभुत्व व जनतेचे त्यांचेवर असलेले प्रेम व विश्वास यांमुळे त्याचा एकतर्फी विजय निश्चित दिसत आहे. खोटी आश्वासने, पैशाचे वाटप व आमदार शेखर निकम यांच्याबद्दल अपप्रचार करून विरोधक आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करित आहेत.

धामापूर जिल्हा परिषद गटातील आरवली येथे रात्री ११.३० च्या सुमारास  कारसह काही व्यक्ती नागरिकांना जबरदस्तीने पैसे वाटप करित असल्याचे तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारायच्या आधी सदर वाहनातील एक व्यक्ती पैसे सदृष्य बॅगेसह   गाडीमध्ये बसून संगमेश्वरच्या दिशेने  चिपळूणच्या दिशेने पलायन केले. ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती तात्काळ आमदार शेखर निकम यांचे स्विय सहाय्यक अमित सुर्वे यांना दिली.

विरोधकांना आपला पराभव दिसत असल्याने त्यांच्या समर्थकांकडून मतदार संघात नागरिकांना पैशाचे सुरु असलेले वाटप किती योग्य आहे? एकीकडे विकासाच्या वलगना करून विरोधक सरड्यापेक्षाही अधिक रंग बदलून जनतेची दिशाभूल करित आहे. त्यांच्या ह्या दिखावटी करभाराला व पैशाचे मुक्त संचार वाटपाला जनताच आता मतदानातून उत्तर देईल.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत