महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शेखर निकम हे पुन्हा निवडणुक रिंगणात आहेत. चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक सिने अभिनेते भाऊ कदम यांच्या उपस्थितीत देवरुख शहरातील रोड शो प्रचार रॅली ला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
शहरातील शिवाजी महाराज चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालय येथून रॅलीला सुरूवात झाली. यावेळी आघाडीचे उमेदवार शेखर निकम यांचेसह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते शिवाजी महाराज चौक- बसस्थानक - बाजारपेठ मार्गे सोळजाई देवी मंदिर अशी प्रचाररॅली काढण्यात आली. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बसस्थानक ते बाजारपेठ या मार्गावर काही काळ ट्रॅफिक जाम झाले होते.. या रॅलीत महीलावर्गाची उपस्थित लक्षणीय होती. या रॅलीवेळी राष्ट्रवादीचे हनिफ हरचिरकर, पंकज पुसाळकर, बाळु ढवळे,दुर्वा वेल्हाळ. प्रफुल भुवड. पंकज पुसाळकर भाजपाचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये, संतोष केदारी, सुशांत मुळे. कुंदन कुलकर्णी. प्रमोद शिंदे. गटाचे बाबु मोरे. रूपेश माने. सचिन मांगले. प्रसाद सावंत यांसह महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
0 Comments