#Kolhapur योगिता घुले यांची कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
महादरबार न्यूज नेटवर्क -
यशवंत ब्रिगेडच्या कोल्हापूर महिला अध्यक्षा सौ. योगिता राजेंद्र घुले यांची कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सौ योगिता घुले यांनी यशवंत ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून धनगर समाजामध्ये सर्वसामान्य महिलांचे काम अगदी धडाडीने केलेले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील आणि श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे विशेष प्रयत्नाने सौ योगिता घुले यांची कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षापदी निवड करण्यात आली.
या निवडीचे पत्र महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुंखे यांनी दिले. निवडीनंतर योगिता घुले म्हणाल्या, यापुढे सर्वसामान्य महिलांसाठी सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा ध्यास आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांचे संघटन वाढवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. निवडीकामी जयसिंगपूरचे माजी नगरसेवक नितीन बागे, कोल्हापूर जिल्हा युवा काँग्रेस उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment