#Varvand:राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची बैठक केंद्रीय वाहतूक मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी यांच्या अध्यक्षतेख़ाली संपन्न
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
केंद्रीय वाहतूक मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या अध्यक्षतेख़ाली व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे विभागातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांची आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीस उपस्थित राहून पुणे -सोलापूर महामार्गासंबंधित विविध समस्या मांडल्या व माननीय नितीनजींना पुढील मागण्यांचे निवेदन दिले -
पुणे -सोलापूर महामार्गावरील दाट लोकवस्ती असलेल्या भागांतील वाहतुकीची कोंडी सुटावी व वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने शेवाळवाडी, लोणी काळभोर, थेऊर फाटा आणि उरुळी कांचन येथील रोड जंक्शन वर उड्डाणपूल बांधण्यात यावेत.
NH- 548 DG न्हावरा - केडगाव चौफुला रस्ता (KM 16/800 ते 41/700 - लांबी 24.9 KM) या रस्त्याचे रुंदीकरण आणि विस्तारीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे.
NH-9 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुका हद्दीतील २१ ठिकाणी अतिरिक्त सर्व्हिस रोड आणि स्लिप रोडचे काम तातडीने पूर्ण करावे.
NH-9 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरवंड ता. दौंड (KM 58/200) येथे अतिरिक्त अंडरपास बांधण्यात यावा.
केंद्रीय रस्ते निधीद्वारे दौंड तालुक्यातील खोरोडी व बोरीबेल येथे रेल्वे अंडर पास साठी निधी मंजूर करावा.
सदर मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन माननीय नितीनजींनी दिले तसेच संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.
या बैठकीला आमदार माधुरीताई मिसाळ, विभागीय आयुक्त श्री. सौरभ राव, महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल रंजन महिवाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, एनएचएआयचे महाराष्ट्र राज्य प्रादेशिक अधिकारी राजीव श्रीवास्तव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment