#Nagapur:हातपाटी वाळू व्यावसायिकांना पूर्वीप्रमाणे परवानगी देण्यात यावी; शेखर निकम यांची नागपूर अधिवेशनात मागणी
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी हातपाटी वाळू व्यावसायिकांना पूर्वीप्रमाणे परवानगी देण्याची मागणी केली.
एप्रिल २०२३ मध्ये शासनाने वाळू संदर्भात नवीन धोरण जाहीर केले. यामध्ये नवीन धोरणात पारंपारिक हातपाटी वाळू व्यावसायांना वगळण्यात आले. तसेच या कारणामुळे स्थानिक लोकांचा रोजगार बुडाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी या वाळू धोरणामध्ये हातपाटीला सामील करून घ्यावे तसेच पूर्वीप्रमाणे हातपाटीचे वाळू गट पुन्हा राखीव करून मिळावे अशी मागणी त्यांनी केली.
हातपाटीद्वारे वाळू काढण्यात येत असताना पर्यावरणाला कोणताही प्रकारचा धोका नाही. तरीदेखील हातपाटीच्या वाळूला परवानगी का मिळत नाही असा सर्वसामान्य माणसांना पडलेला प्रश्न आहे. पारंपरिक हातपाटी वाळू व्यवसाय करणे गेली पाच-सहा वर्ष परवाने द्यायला काही ना काही कारणे सांगून जाणीवपूर्वक उशीर केला जातो परंतु ब्रेजरच्या वाळू उपसाला तातडीने परवानगी दिली जाते. चिपळूण येथे या संदर्भात लाक्षणिक आमरण उपोषण चालू होतं यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तरी निकम यांनी निवेदनाद्वारे औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाला विनंती करत ज्या पद्धतीने शासनाने वाळूचे धोरण जे जाहीर केले त्यामध्ये हातपाटीसारख्या छोट्या व्यावसायिकांना ताबडतोब सामील करून घेण्याची मागणी केली.
Comments
Post a Comment