Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ देवरुख येथे दक्षिण भाजप महिला मैदानात


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४  महायुतीचा विजय होण्यासाठी आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा महायुतीचे  उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी भाजपा महिला मोर्चा पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरल्या आहेत.
                                                                    
देवरुख शहर बागवाडी बूथ क्रमांक २९३ येथे महिला मोर्चा दक्षिण यांनी घरोघरी जाऊन प्रचारपरिपत्रके वाटून राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या विजयासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी महिला पदाधिकाऱ्यांकडून महायुती सरकारचे महत्व भगिनींना सांगण्यात आले .

या प्रचारासाठी माजी नगराध्यक्ष  मृणाल शेट्ये, शहर महिला आघाडी सेक्रेटरी गायत्री बने, जिल्हा उपाध्यक्षा भारती राजवाडे, नगरसेविका मनस्वी आंबेकर, जिल्हा सरचिटणीस स्वाती गोडे, जिल्हा उपाध्यक्षा शितल पंडित, वाॅर्ड अध्यक्ष रंजना नलावडे, श्रद्धा साडविलकर, भारती हेगशेट्ये, प्रशांती शेट्ये आदि पदाधिकारी व भाजपा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments