#Indapur:नरसिंहपुर बावडा परिसरातील बीकेबीएन राज्य मार्गावर अपघातामुळे गतिरोधकची गरज -विद्यार्थी व ग्रामस्थांची मागणी
महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार
बावडा ते नरसिंहपूर राज्य मार्गावर गतिरोधकची गरज , या भागातील विद्यार्थ्यां व ग्रामस्थांची तातडीची मागणी, पावसाची रिमझिम आणि रस्त्यावर होणाऱ्या घसरगुंडीने आपघाताचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्य मार्ग झाला गतिमान यामुळे अनेक वाहने वेगाने वाहू लागलेले आहेत. गेल्याच वर्षी याच राज्य मार्गावर आनेक घटना झाल्या पिंपरी बुद्रुक येथील पेट्रोल पंपाजवळ सूळ वस्ती येथे रस्त्याचे गोल वळण असल्यामुळे भीषण अपघात होऊन दोन दुचाकी स्वार जागीच मृत्यू पावले तरीसुद्धा बांधकाम विभागाला अध्यापही जाग आलेली नाही. अशा घटना अनेकदा होऊ लागल्या आहे. वेळच अशा घटना थांबवण्यासाठी आनेक ठीक ठिकाणी रस्त्याला वळण आसल्यामुळे त्या त्या ठिकाणी गतिरोधकची गरज आहे. बावडा एसटी स्टँड लगतच वळण आसल्यामुळे त्या ठिकाणी गतिरोधकची गरज आहे. कारण अकलूज आणि इंदापूर कडे जाणारी वाहने भरधाव वेगाने जात आसतात. त्या ठिकाणी अति महत्त्वाची गरज आहे.
तसेच गणेशवाडी येथील एसटी स्टँड शेजारी गतिरोधकची गरज,, पिंपरी बुद्रुक येथील पेट्रोल पंपा जवळ गतिरोधकची गरज,, पिंपरी बुद्रुक येथे विद्यालयाच्या समोरील रस्त्यावर गतिरोधकची गरज,, टणु एसटी स्टँड समोर रस्त्यावर, आशा आनेक ठिकाणी रस्त्याला वळण असल्यामुळे त्या त्या ठिकाणी गतिरोधकची गरज भासत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहनांना व प्रवाशांना त्रास होत आहे.
गेले दोन वर्षे झाले रस्त्याचे काम पूर्ण होऊन देखील बावडा ते आडोबा वस्ती रस्त्यावर एकाही ठिकाणी गतिरोधक नाही.
गेल्या वर्षी पेट्रोल पंपानजीक सुळ वस्ती येथे पावसाळ्यातील घडलेला भीषण अपघात घडलेला तालुका बांधकाम अधिकारी यांना माहिती सांगितली आसताना देखील वर्ष पूर्ण होऊन गेले तरी टाळाटाळ करीत आहेत. आज अखेर दुसरा पावसाळा चालू असून देखील गतिरोधक केलेले नाहीत. आशा घडणाऱ्या घटनेला जबाबदार म्हणून इंदापूर तालुका बांधकाम अधिकारी राहातील असे शाळेतील विद्यार्थी ग्रामस्थ व नागरिक यांच्याकडून चर्चेचा सुर.
Comments
Post a Comment