महादरबार न्यूज नेटवर्क - धनगर ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले आकाश पुजारी हे औसा विधानसभेसाठी एकमेव धनगर उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला आहे.
संपूर्ण औसा मतदारसंघातील धनगर ओबीसी बहुजन समाज सत्ता परिवर्तन व्हावे म्हणून आकाश पुजारी यांना निवडून देण्याचे ठरविले आहे अशी चर्चा औसा मतदारसंघात सुरु आहे. याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील आकाश पुजारी यांना मानणारा वर्ग पुजारी यांच्या प्रचारासाठी औसा येथे घोंगडी बैठका घेऊन प्रचार करत आहेत. त्यामुळे निश्चित आकाश पुजारी हे निवडून येणार असल्याचे संकेत आहे. आजपर्यंत आकाश पुजारी यांनी ओबीसो बहुजन समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढले आहे. अनेक आंदोलने, उपोषण, लेखणीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समाजपरिवर्तन पुजारी यांनी केले आहे.
न्यू राष्ट्रीय समाज पार्टीकडून ओबीसी उमेदवार म्हणून आकाश पुजारी यांना निवडून देऊन यंदा सभागृहात पाठवणार असल्याचे ओबीसी मतदारांनी सांगितले.
0 Comments