#Natepute नातेपुते येथील एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूलला दिल्ली बोर्ड सीबीएसई ची मान्यता
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते तालुका माळशिरस येथील समाजभूषण नानासाहेब देशमुख एज्युकेशन सोसायटी संचलित एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूलची नुकतीच सीबीएसई दिल्ली बोर्ड केंद्रीय पथकाकडुन या स्कूलची इमारत, क्रीडांगण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ग्रंथालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, डिजिटल वर्ग खोल्यासह गुणवत्तावर्धक सर्व शिक्षण सुविधाची तपासणी करण्यात आली होती. तपासणी दरम्यान कोणत्याही त्रुटी आढळून न आल्याने एस. एन.डी. इंटरनॅशनल स्कूलला केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्ली द्वारा सीबीएसई बोर्ड अभ्यासक्रमाला अधिकृत प्रशासकीय मान्यता दिली असुन याबाबतचे पत्र नुकतेच संस्थेला प्राप्त झाले आहे. एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूलला केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिल्ली द्वारा सीबीएसई मान्यता मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी मुख्याध्यापक संदीप पानसरे, उप - मुख्याध्यापक शकूर पटेल, संस्थेचे पी.आर.ओ. मनोज राऊत व शिक्षक कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख बोलत असताना म्हणाले की, स्कूल सीबीएसई बोर्ड संलग्न झाल्याने संस्थेचा गुणवत्तेचा स्तर आणखीन वाढण्यास मदत होणार आहे. सीबीएसई मान्यताप्राप्त झाल्याने संस्थेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असुन शैक्षणिक पटलावर एस. एन.डी. स्कूलची गुणवत्ता अधोरेखित झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील आधुनिक शिक्षण देण्यासाठी डिजिटल क्लासरूम द्वारे दर्जेदार शाळा उभारण्याचा मनोदय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांनी या प्रसंगी बोलत असताना व्यक्त केला. यावेळी स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख बोलत असताना म्हणाले की, नातेपुते सारख्या ग्रामीण भागात समाजभूषण नानासाहेब देशमुख एज्युकेशन सोसायटी संचलित एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूलची उभारणी करून या ठिकाण सर्व शैक्षणिक भौतिक सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिल्याने अल्पावधित एस.एन.डी इंटरनॅशनल स्कूलने मोठी झेप घेतली आहे. नातेपुते व परिसरातील पालकांनी या शाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याने व शाळेचे शिक्षक चांगले अध्यापन करत असल्याने स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तावर्धक शिक्षण मिळत आहे.याशाळेला सीबीएसई बोर्ड ची मान्यता मिळाल्याने संस्थेची जबाबदारी आणखीन वाढली असल्याचे मत एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक संदीप पानसरे, उप - मुख्याध्यापक शकूर पटेल, संस्थेचे पी.आर.ओ.मनोज राऊत, शिक्षिका सारिका पानसरे, मोनिका बरडकर, ज्योती मोरे, तहसीन शेख, जास्मीन काझी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलचे प्राचार्य व शिक्षक कर्मचारी यांनी दिल्ली बोर्ड केंद्रीय पथकाकडून तपासणी दरम्यान स्कूल मधील कामकाजाचे योग्य नियोजन करून परिश्रम घेतले होते.कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment