महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीदूतांच्या कृषी संलग्न केंद्राचे उद्घाटन संगम सरपंच नारायणराव ताटे-देशमुख यांच्या हस्ते झाले.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष- संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य आर. जी. नलावडे, प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. एच. व्ही. कल्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित कल्याणी,दिपक पांढरे,श्रीनाथ पवार, केतन सारोक्ते,प्रतीक गायकवाड,रोहन माळी,हर्षल सुडके,अमरनाथ देसाई व करण भोंगळे या कृषीदूतांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण, सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, औषध फवारणी आदी बाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी संगमचे उपसरपंच- आबा ताटे-देशमुख प्रगतशील शेतकरीवर्ग आणि कृषीदूत उपस्थित होते.
0 Comments