महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील रेणुकादेवीची यात्रा मोठ्या उस्हात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. प्रथम १०डिसेंबर रोजी जत येथुन कुसमोड येथे ज्योत आणुन यात्रेस प्रारंभ झाला. ११ डिसेंबर रोजी पालखीचे व जगाचे मंदीराकडे प्रस्थान, १२ डिसेंबर रोजी देवीचा महानैवेद्य व गंध लिंबाचा कार्यक्रम व संध्याकाळी देवीजवळ गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. १३ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता पुजारी चंद्रकांत सरगर यांच्या घरून फुलाचा मान घेऊन मंदीराकडे प्रस्थान, सकाळी देवीचा अभिषेक व पुजा कैलास धायगुडे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली, त्यानंतर डॉक्टर उत्तम सरगर यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. यानंतर पालखी माहेर घरासाठी रवाना पहीले माहेर डॉक्टर सूरेश सातपुते व पत्नी सारीका सातपुते यांच्या घरी ,नंतर मानकरी उत्तम मोरे यांच्या घरी माहेर संपन्न झाले. तलवारीचे मानकरी संतोष व्होनमाने यांच्या हस्ते तलवार पुजन करुन गावातील सर्व घरांचे माहेर घेऊन आरती होऊन पालखीचे दुपारी चार वाजता कुंडावर आगमन ,कुंडाचे मानकरी अशोक सातपुते यांच्या हस्ते पुजा व आरती संपन्न झाली. यावेळी माजी सरपंच तुषार लवटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले.यानंतर पालखीचे आगमन वेशीतील मानकरी अशोक राजगे यांच्या घरी झाले. व नंतर दशरथ व मधु व्होनमाने यांच्या घरी पालखीचे आगमन यावेळी नारळाचा मान सिद्धेश्वर व्होनमाने यांना देण्यात आला.यानंतर पालखीचे मंदीराकडे प्रस्थान पालखीचे मंदीराजवळ आगमन यांनतर अग्नीहोमाचे आयोजन पुजन रत्नाकर भोसले पुजारी यांच्या हस्ते तर नारळ मानकरी हेमंत बजरंग धायगुडे यांच्या हस्ते वाढवण्यात आला.तर अग्नी होमावरील तोरण मानकरी दादासाहेब व्होनमाने व सागर व्होनमाने यांच्या हस्ते तोडण्यात आले.
यावेळी अग्नीहोमातुन पुजारी तुकाराम व्होनमाने, सदाशिव व्होनमाने, मधुकर व्होनमाने, सिद्धेश्वर व्होनमाने, ज्ञानदेव व्होनमाने, नवनाथ व्होनमाने, प्रकाश मोरे,चंद्रकांत सरगर, डॉकटर सुरेश सातपुते, रामचंद्र पालखे,दादासाहेब व्होनमाने, ज्ञानेश्वर सातपुते, गौतम मोरे,प्रमोद मोरे,प्रमोद विलास मोरे यांनी अग्नी होमातुन प्रवेश केला. यावेळी कुसमोडचे सरपंच पुरुषोत्तम उर्फ महावीर धायगुडे, माजी सरपंच तुषार लवटे, माजी उपसरपंच व पत्रकार संजय पाटील तसेच कुसमोड व आसपासच्या परिसरातील भाविक भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिन चार दिवस ही यात्रा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.
0 Comments