Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat यवत व परिसरात दत्त जन्मोत्सव उत्साहात साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
श्री दत्तजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा या सोहळ्यात, भाविक  दत्तमंदिरात दर्शनास मोठ्या संख्येने आले होते. मंदिर परिसरात या निमित्त लक्षवेधी भगव्या पताका, भगवे ध्वज, आकर्षक विद्युत रोषणाई, विविध रंगीबेरंगी आकर्षक पुष्प सजावट  करण्यात आली होती. विविध फुलांची सजावट केल्यामुळे मंदिरे लक्षवेधी दिसत होते., दत्तभजन यांच्या सुमधुर आवाजाने मंदिरासह यवत व आसपास चा परिसर धार्मिक भक्तिमय वातावरणात दुमदुमला. 

हरी ओम तत्सत्, जय गुरुदत्त दत्त . ज्ञानेश्‍वरी व गुरुचरित्र चे वाचन  दिपप्रज्ज्वलन, , गुरुचरित्र आणि ग्रंथ वाचन, प्रतिमा पूजन, अभिषेक, पूजा, आरती असे भरगच्च धार्मिक कार्यक्रम झाले.  आरती, पारायण, होमहवन, भजन सेवा,  हरिपाठ, आरती, किर्तन, अन्नदान, हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम परंपरेने झाले. यवत,व परिसरातील  इरिकेशन कॉलनी,चोबे वस्ती, यवत,स्टेशन (कॅनल ग्रुप), व परिसरातील नागरिक, भाविकांना मोठ्या मंगलमय धार्मिक वातावरणात अन्नदान केले.
    श्री गुरुदेव दत्त  मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments