Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras पिलीव येथील विमा प्रतिनिधी दत्तुसिंग भैस यांना एमडीआरटी पुरस्कार प्रदान

  
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील विमा प्रतिनिधी  दत्तुसिंग बाळुसिंग भैस यांना एल आयसीमध्ये उत्तुंग कार्य केल्याबद्दल  सलग पंधराव्यांदा अमेरीकेचा मानाचा एमडीआरटी हा पुरस्कार मिळाला आहे. पिलीव सारख्या ग्रामीण भागात ते १९९९ पासुन विमा प्रतिनिधी म्हणून जवळपास  २५ वर्ष झाले काम करीत आहेत. त्यांनी सलग पाच वर्ष दरवर्षी एक लाख रुपयाचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे बक्षीस म्हणून विमा ग्रामनिधी पिलीव गावाला पंढरपूर शाखेकडून मिळवुन दिला आहे.

सदरचा पुरस्कार  त्यांना  ब्रँच मॅनेजर अनोकर ,पंढरपूर विभागाचे विमा विकास अधिकारी शशिकांत निकम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना एमडीआरटी हा पुरस्कार मिळाल्याबद्दल  बखरनामाचे संपादक उमेश घोंगडे, राहुल खलीपे, गोविंद भैस, विठ्ठल भिसन,हनुमंत पिसे,समर्थ जामदार, नितीन गबाले,  कुमार भैस, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याकडुन त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.           

Post a Comment

0 Comments