Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute: EVM ला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करा - अक्षय भांड


महादरबार न्यूज नेटवर्क -
विधानसभा निवडणुकीत  महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार स्थापन होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून EVM बाबत संशय व्यक्त केला आहे. या मुद्यावरुन भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावरही टीका होत आहे. माळशिरस तालुक्यातील लोकांनी विकासाला मतदान केले आहे.

माळशिरस तालुक्यातील जनता ही दोन्ही गटांना कंटाळली आहे म्हणून त्यांनी तिसरा पर्याय निवडला आणि महायुतीचे उमेदवाराच्या पाठीशी उभी राहीली आम्ही सर्व महायुतीचे नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते प्रामाणिक पणे लढलो पण थोड्या मतांनी आमचा पराभव झाला तो पराभव आम्ही नम्रपणे मान्य करून आज राज्या मध्ये आमचे सरकार आहे माळशिरस तालुक्यासाठी जे काही करता येईल तेवढे करण्याचा आमचा प्रयत्न आहे पण काही लोकांना विजय होऊन ही तो पचवता येत नाही याची मोठी खंत आहे. माळशिरस तालुक्याच्या विकासा चा विचार केला पाहिजे पण काही लोक  फक्त EVM करत सुटले आहेत कदाचित त्यांची पाच वर्षे EVM ला दोष देण्यात जातील असे मला वाटते पण आम्ही मात्र राज्याचे नेते मा.अजित दादांच्या माध्यमातून मोठा निधी तालुक्यासाठी आणणार आहे .

Post a Comment

0 Comments