Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat नानगाव येथे दि २ पासून अखंड हरीनाम सप्ताहास सुरुवात

महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील नानगाव येथे सोमवार दि.०२ डिसेंबर रोजी अखंड हरीनाम सप्ताहाची सुरुवात होणार आहे. नानगाव देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून गेली ६८ वर्ष अविरत हे काम चालू आहे. नानगाव अखंड हरीनाम सप्ताहाचे यंदाचे ६९ वर्ष आहे. ०२ डिसेंबर ते ०९ डिसेंबर या कालावधीमध्ये श्री विठ्ठल रुख्मिणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी ११ ते १२ गाथाभजन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ७ ते ९ कीर्तन नंतर दरदिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विश्वास भोसले यांनी दिली.

नानगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात हा हरिनाम सप्ताह पार पडेल. २ डिसेंबरला ह.भ.प तुकाराम महाराज मुळीक, ०३ डिसेंबरला ह.भ.प पंढरीनाथ महाराज आरु, ०४ डिसेंबरला ह.भ.प पोपट महाराज पाटील, ०५ ह.भ.प ताराचंद
महाराज, ०६ डिसेंबरला ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज शिंदे, ०७ डिसेंबरला ह.भ.प अनिल महाराज पाटील, ०८ डिसेंबरला ह.भ.प परमेश्वर महाराज जायभाये यांचे कीर्तन रंगणार आहे.

पूर्वीपासून अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा या गावाला असल्याने परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. दरवर्षीप्रमाणे वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र आळंदी पुणे यांचा नथुसिंग बाबा अध्यात्मिक ज्ञान प्रचार व प्रसार दौरा दौंड तालुक्यातील नानगाव या ठिकाणहून चालू होतो. आठ दिवस चालणाऱ्या अखंड हरीनाम सप्ताहात संपूर्ण परिसर हरीनामाच्या जयघोषाने दुमदुमून जातो. कीर्तन मंदिराच्या बाहेरील बाजूस होत असल्याने कीर्तनानंतर सर्वाना दरदिवशी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. पूर्वी पेक्षाही कीर्तनासाठी गर्दीमध्ये मोठी वाढ होत आहे. मागील वर्षी गावतील दानशूर व्यक्तीकडून दररोज अन्नदान करण्यात आले होते. यंदा स्वखुशीने अन्नदान करण्यासाठी बहुसंख्येने भाविकांनी सहमती दर्शवली आहे.त्याप्रमाणे अन्नदाते दरदिवशी येणाऱ्या सर्व भाविकांना अन्नदान करणार आहे. अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता ०९ डिसेंबर ला होणार असून काल्याचे कीर्तन ह.भ.प पांडुरंग महाराज घुले यांचे होणार आहे.

Post a Comment

0 Comments