महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यातील रेशन कार्डधारकांना कार्ड मिळाली आहे,धन्य चालू नाही.उत्पन्न दिलेल्या नियमानुसार कमी आहे,धान्य मिळत नाही.रेशन कार्ड मिळाले आहे परंतु धान्य सुरू झाले नाही.अशा कार्डधारकांना धान्य सुरू करण्यासाठी चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांनी बोलताना व्यक्त केले.
सावंत पुढे बोलताना म्हणाले,रेशन दुकान,पुरवठा विभाग,राज्य,केंद्र तसेच प्रधानमंत्री व प्रशासनापर्यंत पत्र व्यवहाराने बऱ्याच गोष्टी सुधारल्या व्यवस्थेत बरासा बदल झाला.परंतु रेशन कार्ड असताना धान्य सुरू नाही यासाठी गरजूंनी एकत्र येणे गरजेचे आहे.व्यवस्थेत सुधारणा होणे महत्त्वाचे होते ते झाले परंतु त्याचबरोबर गरजूंपर्यंत धान्य पोहोचवणे देखील महत्त्वाचे आहे.
आता डिजिटल रेशन कार्ड आली आहेत.डिजिटल रेशन कार्ड व जुनी रेशन कार्ड यामधील भ्रष्टाचार संपविण्यासाठी सर्वांना १२ अंकी नंबर गरजेचा आहे.काही जणांची कार्डमध्ये नावे वाढविणे,कमी करणे तसेच कुटुंबात नावांची संख्या आणि धान्य चालू असणाऱ्यांची संख्या कमी आहे याबाबतच्या त्रुटी दुरुस्त करून गरजूंपर्यंत धान्य पोहोचविण्यासाठी सुरू केलेल्या चळवळीत सर्वांनी सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.
0 Comments