महादरबार न्यूज नेटवर्क - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येते.तरी सदर संजय गांधी श्रावणबाळ योजनेअंतर्गत २१००० उत्पन्नाचे दाखले सर्कल व तलाठी चौकशी होऊन सुद्धा गेले काही महिन्यापासून तहसील कार्यालय मध्ये दाखले प्रलंबित आहेत त्यामुळे वरील सर्व योजनेचे लाभार्थी रोज तहसील कार्यालय मध्ये हेलपाटे मारत आहेत.
त्यामध्ये वयोवृद्ध नागरिक यांचे येण्या-जाण्यामुळे जास्त हाल होत आहे तरी माननीय श्री तहसीलदार साहेब यांनी विनंतीपूर्वक निवेदनाची दखल घेऊन त्वरित योजनेअंतर्गत सर्कल चौकशी व तलाठी चौकशी झालेले उत्पन्नाचे दाखले सोडण्यात यावे असे निवेदन देतेवेळी अण्णा सेना प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री अमित भिंगारदिवे, श्री राजू जाधव, श्री संदीप भागवत, श्री दत्तात्रेय वाघमारे, श्री राजेंद्र बागडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले.
0 Comments