महादरबार न्यूज नेटवर्क -
लोंढे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अध्यक्षांची निवड शाळेचे मुख्याध्यापक श्री लोंढे सर यांनी केले तर अनुमोदन शाळेतील सहशिक्षिका श्रीमती निकम मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोंढे वस्तीवरील पत्रकार श्री हनुमंत माने हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री अशोक गोसावी व नवरत्न ज्वेलर्स चे मालक कदम शेठजी( सराफ )हे उपस्थित होते.
अध्यक्ष व प्रमुख पाहुणे त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जगन्नाथ ज्ञानदेव लोंढे बापू त्याचबरोबर शिक्षण प्रेमी सुरेश लोंढे नाना व इतर मान्यवर यांच्या हस्ते आजच्या या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत ,ध्वजगीत, आणि राज्य गीत घेण्यात आले .शाळेच्या प्रांगणामध्ये शिस्तबद्ध अशी सामुदायिक कवायत घेण्यात आली.
आजच्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शाळेच्या वैभवा मध्ये भर टाकणारे गोष्ट म्हणजे शाळेच्या नावाची कमान याचे उद्घाटन नवरत्न ज्वेलर्स चे मालक कदम शेठजी यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेला सुंदर अशी कमान उभारण्यामध्ये कदम शेठजी(नातेपुते), त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लोंढे बापू, लोंढे नाना, संजय पाटील ,मनोज राजेंद्र गोसावी, करे ,कृष्णात साळुंखे (बापू ),अशोक बापू मोरे ,अशोक गोसावी ,त्याचबरोबर अनिल लोंढे नाना या सर्वांचे खूप सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळेच शाळेला सुंदर अशी कमान आज प्राप्त झाली. त्या सर्वांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार . व्यासपीठावरील मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल-श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला .
मागील पाच सहा महिन्यांमध्ये लोंढे वस्तीवर काही दुःखद घटना झालेल्या होत्या ,त्यामध्ये सुनिल लोंढे,काशिनाथ माने, जनाबाई साळुंखे, कुसुम साळुंखे आणि विद्या मस्कर यांना देवाज्ञा झाली होती ,त्यांचा श्रद्धांजलीपर कार्यक्रम शाळेमध्ये घेण्यात आला. यानंतर उत्कृष्ट अशी विद्यार्थ्यांची भाषणे झाली . यामध्ये अंगणवाडीतील काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
मागील पाच सहा महिन्यांमध्ये लोंढे वस्तीवर काही दुःखद घटना झालेल्या होत्या ,त्यामध्ये सुनिल लोंढे,काशिनाथ माने, जनाबाई साळुंखे, कुसुम साळुंखे आणि विद्या मस्कर यांना देवाज्ञा झाली होती ,त्यांचा श्रद्धांजलीपर कार्यक्रम शाळेमध्ये घेण्यात आला. यानंतर उत्कृष्ट अशी विद्यार्थ्यांची भाषणे झाली . यामध्ये अंगणवाडीतील काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये नंबर मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरेश लोंढे नाना यांच्यातर्फे कैलासवासी सुनील लोंढे भाऊ यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले .त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विठ्ठल भानुदास काटे यांनी शाळेतील सर्व ४०विद्यार्थ्यांसाठी वह्या आणि पेनचे वाटप त्यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यामध्ये देशप्रेम जागृत व्हावे, राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी यासाठी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
त्यामध्ये इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी स्कूल चले हम, तिसरी चौथीच्या मुलांनी देशभक्तीपर गीत जलवा जलवा आणि इयत्ता तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी गीताचे उत्कृष्ट आणि सुरेख असे सादरीकरण केले आणि तेवढ्याच उत्स्फूर्तपणे पालकांनीही या सांस्कृतिक कार्यक्रमास बक्षीस रूपाने कार्यक्रमास प्रतिसाद दिला . मान्यवरांचे मनोगत यामध्ये वस्तीवरील सुरेश लोंढे नाना यांनी आपल्या मनोगत मध्ये शाळेच्या अडीअडचणी याबाबत आपले विचार व्यक्त केले . शाळेला कमान झाली आता शाळेला गेट ची गरज आहे असे नानांनी शाळेची अडचण त्यांच्या मनोगत मध्ये बोलून दाखवली. त्याचबरोबर लोंढे बापू यांनीही शाळेची अडचण सर्व पालकांसमोर मांडली. बापूंनी व नानांनी बोलून दाखवलेल्या अडचणीला लगेच आपल्या वस्तीवरील स्वप्नजीत पवार ,अशोक गोसावी ,दादा गोसावी आणि विजय बुधावले यांनी, येणाऱ्या 15 ऑगस्ट पर्यंत शाळेला एक सुंदर असे गेट बसून देण्याचे त्यांनी या कार्यक्रमांमध्ये जाहीर केले त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हनुमंत माने यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यावेळी ते म्हणाले की जिल्हा परिषद शाळा लोंढे वस्ती येथे विद्यार्थी संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि येथील पालकांचाही शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. तसेच येथील शिक्षकही खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात त्यामुळे विद्यार्थी संख्या मोठी दिसत आहे.आजच्या या कार्यक्रमास वस्तीवरील बहुसंख्य पालकांनी विद्यार्थ्यांसाठी गोड खाऊन शाळेला दिलेला होता त्या खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी वस्तीवरील बहुसंख्य पालक - माता भगिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्रदर्शन शाळेतील सहशिक्षिका श्रीमती निकम मॅडम यांनी केले .सर्व पालकांचे आणि मान्यवरांचे शाळेच्या वतीने आभार मानले विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments