महादरबार न्यूज नेटवर्क - येथील आठवडा बाजार बुधवार या दिवशी असल्याने नातेपुते शहरात एकवीस खेड्यापाड्यातुन नागरिक आठवडा बाजार करण्यासाठी या ठिकाणी येत असतात परंतु बाजार बुधवार दिवशी असल्याने शहरात लाईट लोड शेडिंग केले जात होते.त्यामुळे गावातील छोट्या मोठ्या व्यवसाय यांना आपला व्यवसाय करता येत नव्हता व अर्थकारण त्यामुळे होत नव्हते म्हणून गावकऱ्यांच्या वतीने अण्णा सेना प्रतिष्ठान यांनी नातेपुते विद्युत मंडळ उपाभियंता यांना व अकलूज कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन संबंधित लोड शेडिंग तात्काळ आठवडा बाजार वेळेस ते बंद करण्यात यावे व अशी मागणी निवेदनातून केली असता व दिनांक २७ जानेवारी रोजी नातेपुते विद्युत वितरण कंपनी अभियंता यांच्या कार्यालय समोर एक दिवशीय लक्षणे उपोषण करण्यात येणार होते परंतु संबंधित उपअभियंता अधिकारी नातेपुते यांनी अण्णासेना प्रतिष्ठान निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आठवडा बाजार दिवशी पूर्ण दिवस लोड शेडिंग न करता फक्त एक तास केले जाईल असे पत्र संबंधित अण्णा सेना प्रतिष्ठान अध्यक्ष संस्थापक महाराष्ट्र राज्य श्री अमित भिंगारदिवे यांना देण्यात आले.
सदरचे पत्र अध्यक्षांनी स्वीकारून व लोडशेडिंगचा प्रश्न संबंधित अधिकारी यांनी मार्गी लावला असता व त्यामुळे दिनांक २७ जानेवारी रोजी चे एकदिवशी लक्षणे उपोषण स्थगिती करत आहोत व संबंधित अधिकाऱ्यांचे अण्णासेनेमार्फत आभार मानले जात आहे. व सर्व व्यापार वर्गातून अण्णा सेना प्रतिष्ठानचे कौतुक केले जात आहे.
0 Comments