मा. आमदार रामभाऊ सातपुते यांच्या निधीतून पिलीवमध्ये आलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी पिलीव परीसरात आपल्या आमदार फंडातुन मंजूर केलेली विकास कामे यामध्ये सुरू असणाऱ्या कामाची पाहणी केली काळामळा येथील डांबरीकरण केलेला रस्ता, महालक्ष्मी देवीकडे जाणाऱ्या ओढयावरील पुलाची पाहणी,तर महालक्ष्मी मंदिर परीसरात मंजूर केलेल्या भक्त निवास व पेव्हर ब्लॉक याचे भुमीपुजन, पिलीव येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे भुमीपुजन तसेच भैस- सुळे - भिसन वस्ती ओढयावरील पुलाचे उदघाटन तेथील स्थानिक जनतेच्या हस्ते करण्यात आले यावेळी मा.आमदार रामभाऊ सातपुते यांनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले .याठिकाणी भाविक भक्तांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध असुन निधी कमी पडु देणार नसल्याचे सांगीतले.
भाजपने मंंजुर केलेल्या कामांचे उद्घाटन आम्हीच करणार
भाजपने मंंजुर केलेल्या कामांचे उद्घाटन आम्हीच करणार तुमच्यात धमक असेल तर कामे मंजूर करुन त्याचे उद्घाटन करावे - मा.आमदार रामभाऊ सातपुते
भाजपने मंंजुर केलेल्या कामांचे उद्घाटन आम्हीच करणार तुमच्यात धमक असेल तर कामे मंजूर करुन त्याचे उद्घाटन करावे - मा.आमदार रामभाऊ सातपुते
यावेळी पत्रकार दिनानिमित्त पिलीव येथील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आ.रामभाऊ सातपुते यांनी पिलीव गावाला आमदार असताना प्रचंड निधी मंजुर केला असल्याचे सांगितले. तर त्यांनी यावेळी आगामी ग्रामपंचायत निवडणुक पुर्ण ताकदीने लढा व भारतीय जनता पार्टीची सत्ता आणा पिलीवचा प्रचंड विकास करतो .गावच दत्तक घेतो असे जाहीर पणे सांगीतले.पाहणी दौऱ्याचे नियोजन भारतीय जनता पार्टी पिलीव शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.पिलीव येथील काळा मळा या ठिकाणी आ.सातपुतेंनी भेट दिली यावेळी राहुल मदने,अतुल नष्टे,निलेश पिसे,दिपक पिसे,शशिकांत पिसे,गणेश पिसे,दिनेश लगड, अंकुश भैस रामभाऊ गोरड महालक्ष्मी मंदिर परिसरातील भूमिपूजनावेळी पुजारी शंकर शेंडगे, दादा वगरे,संतोष कुमार शेंडगे सर, शिवाजी शेंडगे,सागर शेंडगे, सुखदेव वगरे,विशाल शेंडगे,राहुल भैस,प्रदिप बगाडे,फिरोज शेख,आदी मान्यवर उपस्थित होते तसेच पिलीव शासकिय विश्राम गृह येथे भूमीपूजनावेळी सरपंच नितीन माळी यांचे भाऊ राजू माळी,शिवराज पुकळे, निलेश कांबळे, तुषार लवटे,अर्जुन सुळे,प्रविण वाघमारे,बचेरी चे गणेश पाटील,प्रदीप चोबे,गलांडे मेजर,सुखदेव वगरे,व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते महालक्ष्मी मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाची पाहणी करताना सोबत मयूर भैस,अनंत जामदार,प्रविण वाघमारे,मदन भिसन,योगेश शेंडगे ,प्रमोद भैस आदी मान्यवर उपस्थित होते. भैस, सुळे व भिसन वस्ती येथील पुलाचे भव्य दिव्य उद्घघाटन व लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी मधुकर भैस,अर्जुन सुळे,तानाजी सुळे ,किसन भिसन,नारायण भिसन,कुबेर भैस,महादेव,भैस,दिगंबर भैस,विकास सुळे,अविराज सुळे,तसेच महिला इंदू भैस,सुशीला भैस,पूनम भैस,संजना भिसन, कल्पना सुळे,शितल सुळे,मोनाली भैस,सोनम भैस,मीनाक्षी भैस,तसेच सर्व पत्रकार बांधव दामोदर लोखंडे,संजय पाटील,रामचंद्र मगर,संजय देशमुख,गणेश देशमुख, सुजित सातपुते,उदय कदम,शाहरुख मुलाणी,संजय रोकडे उपस्थित होते.
0 Comments