महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते नगरपंचायत प्रभाग क्र.१७ मधील विविध अडचणी व विकास कामे यांची २५ जानेवारी २०२५ पर्यंत दखल घेण्यात यावी.अन्यथा २६ जानेवारी २०२५ पासून नातेपुते नगरपंचायत समोर आमरण उपोषण करणार आहे असे पत्र प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिक प्रमोद ( गोविंद ) अरूण माने यांनी नातेपुते नगरपंचायत चे मुख्याधिकारी साहेब यांना दिले आहे.
त्यांच्या मागण्यांबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. १) पाणीपुरवठा करणारी नवीन टाकलेली पाईप लाईन विठ्ठल रूक्मिणी मंदिर समोर गेली दोन महिने झाले लिकेज् आहे ती तात्काळ दुरुस्त करणे तसेच पाणी चेंबर व्यवस्थित झाकण्यात यावा.
२) ६० वर्षांपूर्वीचे पुरुष शौचालय स्थानिक नागरिकांना विचारात न घेताच राजकीय फायद्यासाठी तसेच खाजगी जागा विक्री साठी शौचालय नियमबाह्य पद्धतीने पाडण्यात आले आहे ते तात्काळ बांधण्यात यावे.
३) टिळक चौकातील मेन रोड बंदिस्त गटारीवरील झाकण काढून दुरुस्तीसाठी उघडा ठेवला आहे.त्यामुळे तिथे अपघात होत आहेत.तो तात्काळ दुरूस्त करणे.
४) मंदार यांचे घर ते उप आरोग्य केंद्र पर्यंत डांबरीकरण रस्ता करणे.
५) बागवान घर ते देशपांडे घर यामधील बोळ बंदिस्त गटार दुरूस्त करणे व पेव्हर ब्लॉक बसवणे.
६) विसावा जवळ,उप आरोग्य केंद्र जवळ व समोर सतत सांगूनही कचरा उचलला जात नाही.
७) जुनी मंडई परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.तेथील स्वच्छता दररोज करण्यात यावी.
शहरातील इतर विषय : १) शहरात सार्वजनिक मुतारी ची सोय करण्यात यावी.
२) नातेपुते नगरपंचायत स्मशानभूमी नूतनीकरण करणेबाबत तसेच नियमित स्वच्छता करण्यात यावी.
३) घनकचरा टेंडर नुसार ठेकेदाराकडून कचरा उचलला जात नाही त्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित ठेकेदारावर शासकीय नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी.
४) सार्वजनिक शौचालय स्वच्छता नियमित करणेबाबत.
या मागण्या २५ जानेवारी पर्यंत पूर्ण न झाल्यास २६ जानेवारी रोजी आमरण उपोषण सुरू करणार आहे असे पत्र नातेपुते नगरपंचायत चे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी सोलापूर, उपविभागीय अधिकारी अकलूज, तहसीलदार माळशिरस व नातेपुते पोलिस स्टेशन यांना दिले आहे असे त्यांनी सांगितले.
0 Comments