महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत दौंड तालुक्यातील समाविष्ट गावातील विविध समस्यांबाबत पीएमआरडीए चे आयुक्त श्री. योगेश म्हसे पाटील यांची भेट घेतली.
यावेळी खालील मुद्दांवर चर्चा करण्यात आली दौंड तालुक्यातील धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी आराखडा करण्यात यावा, अंतर्गत रस्ते, पार्किंग, पाणीपुरवठा व भाविकांसाठी निवारा शेड उभारण्यात यावेत. भविष्यातील वाढते नागरिकीकरण व औद्योगिकीकरण लक्षात घेता रिंग रोड, गावातील रस्ते व पुल यांचा एकात्मिक आराखडा तयार करण्यात यावा तसेच नव्याने उभारण्यात. येणाऱ्या पुरंदर अंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारे सर्व रस्ते सुसज्ज होतील यासाठी नियोजन करण्यात यावे.
दौंड तालुक्यातील सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रासाठी समाविष्ट गावांसाठी क्रीडा संकुल व सांस्कृतिक केंद्र उभारण्यात यावे. राहू व यवत या गावांना अर्बन ग्रोथ सेंटर जाहीर करण्यात आले असून, आवश्यक सर्व भौतिक सुविधा पुरविण्यात याव्यात. पुणे सोलापुर रेल्वे मार्गावरील सुमारे ९६ कोटी रुपयांच्या यवत ते राहू दरम्यान मंजुर करण्यात आलेल्या पुलाचे काम सुरु करावे.
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नवीन लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी पुढील प्रकल्प अहवालाचे काम गतीने पूर्ण. करण्यात यावे, मंजुर असलेल्या अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना विनाविलंब मिळावी. दौंड तालुक्यातील पीएमआरडीए हद्दीतील गावांसाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी. यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरनातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments