Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplunआरवली निर्मल ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
आरवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या आमदार शेखर निकम यांच्या हस्ते निर्मल ग्रामपंचायत आरवलीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यास गावातील मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उद्घाटनप्रसंगी ग्रामस्थांनी आपल्या मागण्या आणि समस्यांचे निवेदन आमदार शेखर निकम यांच्यासमोर सादर केले. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देणाऱ्या आमदार शेखर निकम यांनी त्यावर तत्काळ सकारात्मक दृष्टीकोन घेत ग्रामविकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आणि निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

ग्रामपंचायतीच्या या नूतन इमारतीमुळे गावच्या प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विकासकामे अधिक प्रभावीपणे राबविता येतील. गावाच्या प्रगतीचा विचार करता, पुढील काळात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत बाबींवर अधिक भर दिला जाईल, असे आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केले.

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. यापुढेही आरवलीच्या सर्वांगीण विकासासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन, असे आश्वासन देत आमदार शेखर निकम यांनी ग्रामस्थांना गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि विश्वासाचे भाव स्पष्टपणे दिसत होते. विकासाची ही नवी वाटचाल अधिक गतिमान आणि सर्वसमावेशक होईल, याची खात्री या सोहळ्यातील प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली.

यावेळी दिलीप सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, सरपंच निलेश भुवड, पोलीस उपनिरीक्षक विवेक साळवी साहेब, सुशील भायजे, शेखर उकार्डे, बंडूशेठ पाटणकर, जाकीर शेखासन, सुभाष गुरव, कृष्णा भोसले, स्वाती भुवड, गजानन सुर्वे, गणपत चव्हाण, प्रकाश वीर, चंद्रकांत भुवड, संतोष अंबोरे, राजेंद्र पिलणकर, पारसे सर, दत्ताराम तांबे, लक्ष्मण भुवड, दत्ताराम भुवड, उमेश साहिल, उमेश लागाटे, सचिन बने, गणेश कुळये, रवींद्र लांबे, राजेंद्र पवार, महेंद्र भुवड, दीपक जाधव, विजय शिवगण, ग्रामविकास अधिकारी, अभिजित चव्हाण, विनायक राजेशीर्के, संदीप शेडगे, राजेश फणसे, मधुकर कांबळे, नारायण भुवड, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments