महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील कुणबी समाज भवनाच्या विस्तारिकरणासाठी ५० लाखांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी दिलेला शब्द पाळत, समाजाच्या मागणीला न्याय दिला आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच कामांना गती मिळणार आहे.
समाजाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना देण्यासाठी हे भवन विस्तारिकरण महत्त्वाचे ठरणार आहे. भव्य, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा असलेल्या या समाज भवनामध्ये विवाहसोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक मेळावे आयोजित करता येणार आहेत.
आमदार शेखर निकम यांनी जनतेशी दिलेला शब्द पाळत आपल्या कामाची परिणामकारकता पुन्हा सिद्ध केली आहे. विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा करत प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे आणि निधी मंजूर करून आणणे हा त्यांचा नेहमीच प्राधान्यक्रम राहिला आहे.
कुणबी समाज भवनाच्या विस्तारासाठी निधी मंजूर झाल्याने समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांनी आमदार निकम यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
"सामाजिक सलोखा आणि विकासाची गती हीच आमची खरी बांधिलकी आहे. समाजाच्या हितासाठी काम करणे हे माझे कर्तव्य असून, कुणबी समाज भवनाचे हे विस्तारिकरण त्याचेच एक प्रतीक आहे," असे आमदार शेखर निकम यांनी सांगितले.
प्रशासकीय मान्यता मिळाल्याने योजना कार्यान्वित करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या भव्य समाज भवनाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आता अंतिम टप्प्यातील प्रक्रिया गतिमान होणार आहे.
0 Comments