महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
मातृमंदिर देवरुख हॉस्पिटल आणि चाळके किडनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवरुख येथे डायलिसिस सेंटरचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मा. जि. प. अध्यक्ष रोहनजी बने आणि नगरपरिषद मुख्याधिकारी चेतन विसपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, ग्रामीण भागातील रुग्णांसाठी डायलिसिससारखी सेवा सहज उपलब्ध होणार आहे. आमदार शेखर निकम यांनी यावेळी 'आरोग्य हीच खरी संपत्ती' असल्याचे सांगत सामाजिक संस्थांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, अध्यक्षा पल्लवी कोरगावकर, चाळके फाउंडेशनचे अनिल चाळके, डॉ. गोरे मॅडम, प्रद्युम्न माने, आणि मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष वैद्यनाथ जागुष्टे यांनीही आपली मते व्यक्त केली.
कार्यक्रमाला आबा पंदेरे, बंड्या बोरुकर, हनिफशेठ हरचिरकर, बाळु ढवळे, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, नितीन भोसले, मंगेश बांडागळे, राजू वनकुंद्रे, बंडू जाधव, दिपक खेडेकर, हुसेन बोबडे, बाळू वनकर, रामू शेठ पांदेरे, सचिन मांगले, बबन बोदले, सुबोध पेडणेकर, बाळा माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments