महादरबार न्यूज नेटवर्क - महा किड्स सी.बी.एस.ई स्कूल फोंडशिरस रोड नातेपुते येथे क्रीडा सप्ताहाचे उदघाट्न नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने साहेब व शिवप्रसाद उद्योग समुहाच्या संचालिका सौ. ऋतुजाताई मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
संस्थेला मोठे क्रीडागणं असणे गरजेचे असते. महा किड्स ला मोठे क्रीडागणं आहे. धावण्यासाठी चारशे मी. चा ट्रॅक आहे. मल्लखांब, योगा, बुद्धिबळ आणि इतर मैदानी खेळासाठी विद्यार्थी घडवण्यात संस्था नेहमी सक्रिय असते. मल्लखांब सारखा धाडशी, चपळतेचा पारंपारीक खेळ संस्थेत शिकवीला जातो याचे कौतुक परजने साहेब यांनी केले. तसेच सौ. ऋतुजाताई मोरे यांनी संस्थेचा परिसर, शिस्त आणि विद्यार्थ्यांची खेळातील तयारी याचे विशेष कौतुक केले. तसेच बुद्धिबळ हा खेळ खेडोपाडी माहित झाला पाहिजे असे प्रतिपादन सौ. मोरे यांनी केले. इनडोअर आणि आऊटडोअर खेळाचे उदघाट्न यावेळी पार पडले.
संस्थेचे अध्यक्ष अँड. शिवशंकर पांढरे यांनी प्रास्ताविक पर भाषणात महा किड्स चे विद्यार्थी पुढील वर्षी मल्लखांब, योगा, बुद्धिबळ मध्ये राष्ट्रीय पातळीवर चमकतील असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयेशा मणेरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्या अँड. अमृता दाते, गौर्री ढोपे, कोमल रणदिवे, वैशाली पालवे,कोमल कोडलकर यांनी परिश्रम घेतले.
0 Comments