महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जि परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगरचे वार्षीक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात साजरे करणयात आले. यावेळी प्रथम सावित्रीबाई फुले व स्व ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करणयात आले. यावेळी केंद्र प्रमुख राजकुमार फासे,केंद्र प्रमुख राजेंद्र सुरवसे व राजु गोरवे,तसेच माजी पंचायत समिती सदस्या शोभाताई मदने,माजी सरपंच तुषार लवटे, माजी उपसरपंच स्वाती मदने,चेअरमन धनाजी मदने,अध्यक्ष शशिकांत घडयाळे, उपाध्यक्ष स्वाती गारुळे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक सुहास कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य शहाजी लेंगरे ,माळशिरस तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक सचिन गाटे व अमोल नष्टे, माजी उपसरपंच संजय पाटील या मान्यवरांच्या हस्ते करणयात आले. यावेळी मुख्याध्यापक सुहास कोल्हे यांनी प्रास्ताविक केले तर सचिन गाटे ,केंद्रप्रमुख राजकुमार फासे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या कुसमोड येथील सर्वच विदयार्थनचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करणयात आला. तसेच डॉक्टर स्नेहा भाळे हिने डाक्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल तसेच मुख्याध्यापक सुहास कोल्हे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर संजय पाटील यांना आदर्श ग्रंथमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करणयात आला.यावेळी अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थीनी बहारदार गाणयावर नृत्य करीत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
सदरच्या कार्यक्रमास पिलीव व आसपासच्या केंद्रातील शिक्षक ,तसेच माजी सरपंच अरुण मदने,जितेंद्र पाटील, डॉकटर शंकर भाळे,कुसमोड येथील लेंगरेवस्ती, पवारवस्ती व इतर शाळेतील शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच लक्ष्मीनगर शाळा व्यवस्थापन समितीचे शाळा व्यवस्थापन समितीचे आजी माजी पदाधिकारी तसेच पालक ,ग्रामस्थ या सदरच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमासाठी सहशिक्षक सुनिल डुरे, अंगणवाडी सेविका सरगर यांनी विशेष परीश्रम घेतले. मुलांना डान्सचे प्रशिक्षण प्रजीत रजपुत यांनी दिले.या कार्यक्रमाप्रसंगी मुलांनी २५ वेगवेगळ्या मराठी, हिंदी गाणयावर बहारदार नृत्य केले. सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन झाडे सर ,चौरे सर व औटी सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुहास कोल्हे यांनी मानले.
0 Comments