Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute महा किड्सने विविध स्पर्धा परीक्षा राबवाव्यात - राम सातपुते


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते- महा किड्स सी. बी. एस. ई स्कूल फोंडशिरस रोड नातेपुते या स्कूल च्या बाराव्या वर्धापन दिवस आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. आ. राम सातपुते हे  होते.  महा किड्स चा बारावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मा. आ. राम सातपुते यांनी ग्रामीण भागातील आणि माळशिरस तालुक्यातील पाहिली शाळा म्हणून महा किड्स चा उल्लेख होतो असे सांगितले. संस्थेने विविध स्पर्धा पारीक्षा राबवून मोठे अधिकारी घडवावेत असे प्रतिपादन केले. 


सोलापूर जिल्ह्यात  विद्यार्थ्यांना मल्लखांब  प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था आहे.  अशा खेळामुळे मुले तल्लख  आणि चपळ बनतील पालकांनी पूर्ण  ताकतीने आपल्या मुलांना घडवावे, मुलंच संस्थेचाआणि पालकांचा लौकिक वाढवतीलं. अँड. शिवशंकर पांढरे मुलांसाठी अविरत झटत असतात यांचे त्यांना सर्वांनी सहकार्य करावे. संस्थेस कसलीही मदत लागल्यास आंम्ही करू असे आश्वासन मा. आमदार राम सातपुते यांनी केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे   शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे, समता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड.बी वाय राऊत, आणि पांढरे उद्योगसमूहाचे मालक राजेंद्र पांढरे उपस्थित होते. कार्यक्रमांची सुरुवात मल्लखांब प्रात्यक्षिक आणि डिजिटल क्लासरूम उदघाट्नाने झाली.  दिप्रज्वलंनानंतर संस्थेचे अध्यक्ष अँड. प्रा. शिवशंकर पांढरे यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेची स्थापना आणि संस्था संध्या कोणते उपक्रम
राबवले जातात याबद्दल माहिती दिली. बेस्ट स्टुडन्ट ऑफ दी इयर २०२५ चा पुरस्कार कृष्णराज  प्रकाश पदमन आणि वेदिका विशाल बंडगर यांना देण्यात आला. चेस प्लेयर ऑफ दी इयर पुरस्कार आरुष सुशील गांधी यांस देण्यात आला. बेस्ट पेरेंट्स ऑफ दी इयर पुरस्कार   सौ. व श्री स्वप्नाली सुभाष शिंदे आणि सौ. व श्री. आशा संतोष ढोपे यांना देण्यात आला.  हाऊस ऑफ द इयर  पुरस्कार सॅफ्रॉन  हाऊस ला देण्यात आल. बेस्ट टीचर ऑफ दी इयर पुरस्कार मिस. कोमल नंदू रणदिवे यांना देण्यात आला. तसेच मॅथ्स जिनियस ऑलिम्पियाड एक्साम प्रविण्या मिळविल्याबदल संस्थेस केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेतर्फे स्कूल ला सन्मान चिन्ह देण्यात आले.

यावेळी विविध वार्षिक क्रीडा स्पर्धाचे पारितोषिक वितरण झाले. धावणे, योगा, बुद्धिबळ, मल्लखांब, खो-खो आशा खेळांच्या विजेत्याना ट्रॉफी,मेडल आणि प्रशस्तिपत्रक प्रदान  करण्यात आले.  बक्षिस वितरनास पांढरे इलेक्ट्रॉनिक्स, आदित्य कन्स्ट्रक्शन, वैष्णवी हार्डवेअर, विद्या प्रतिष्ठान कॉलेज बारामती चे प्रा. संजय खिलारे यांनी योगदान दिले.  देशभक्ती,खेळ,  स्वामी विवेकानंद,जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीमाई अशा थोर व्यक्तिमत्वावर आधारित गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात समावेश  होता.

कार्यक्रमांस संस्थेचे चेअरमन तेजस्विनी पांढरे, सचिव अलका, पांढरे, निशाताई सरगर, सिताराम पांढरे, डॉ. सतीश झंजे,  मेजर सुरेश पांढरे,संदिप कदम, अमोल शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थी आरुष गांधी, सिद्धिका मुलांनी  आणि निवेदक संदिप जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महा किड्स शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक ड्राइवर यांनी योगदान  दिले.

Post a Comment

0 Comments