महादरबार न्यूज नेटवर्क -
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली १८/३/२०२५ रोजी नातेपुते पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीर उत्साहात पार पडले.
यावेळी रक्तदान शिबिरासाठी ज्ञानदीप ब्लड बँक नातेपुते यांच्या वतीने येथील पोलीस ठाण्यात ५० खाटा तसेच ५५ आरोग्य सेवकांसह तज्ञ डॉक्टरांचे नियोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरा करता प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे साहेब, पीएसआय दिघे साहेब ,पीएसआय ओमासे साहेब, पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ, होमगार्ड व सर्व पोलीस पाटील यांनी अथक परिश्रम घेतल्याने सदर रक्तदान शिबिरात एकूण ९०३ रक्तदात्यांनी रक्तदान करत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
यामध्ये प्रामुख्याने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो अकलूज यांनी शिबिरास भेट देऊन स्वतः रक्तदान करून प्रभारी अधिकारी, पोलीस स्टाफ, होमगार्ड व पोलीस पाटील व शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांचा सत्कार केला.
तसेच सदर रक्तदान शिबिरात नातेपुते पोलीस ठाणे यांचे नातेपुते शहरासह पोलीस ठाणे हद्दीतील ३१ गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान एक सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.
यावेळी नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील सामाजिक संस्था पत्रकार बांधव सर्व गावातील गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी आर्ट ऑफ लिविंग चे सर्व पदाधिकारी हिंदू व मुस्लिम संघटनांचे पदाधिकारी नातेपुते येथील तृतीयपंथी लोक ग्रामीण भागातील १३ महिला मजूर वर्ग शेतकरी वर्ग यांनी देखील या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला तसेच लोणंद येथील तीन लोकांनी सहकुटुंब येऊन रक्तदान केले. सदरचे रक्तदान शिबिर हे रात्री ८.४५ वाजेपर्यंत रक्तदाते येत असल्याने सुरू होते.
0 Comments