महादरबार न्यूज नेटवर्क -
भगवान महावीर हे वीर , अतिवीर , सन्मति आणि वर्धमान म्हणूनही ओळखले जाणारे, जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते . त्यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व-वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थंकरांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणींचा विस्तार केला. जैन परंपरेत असे मानले जाते की ६ व्या शतकाच्या पूर्वार्धात महावीरांचा जन्म आजच्या बिहार, भारत मधील कुंडलपूर येथे राजा सिद्धार्थ व राणी त्रिशलामाता यांचेपोटी क्षत्रिय कुटुंबात झाला. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी सर्व ऐहिक संपत्ती , संसार व राजपाट याचा त्याग केला.त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून चंदुकाका सराफ या सुवर्णपेढीच्या वतीने महावीर पथ या ठिकाणी मोफत पाणी वाटप करण्यात आले. या सुवर्णपेढीने नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.
सध्या सोने व चांदीचे दर हे कमी जास्त होताना आपण बघत आहोत. यासाठी रेट बुक करण्याकरिता गोल्डन शाईन प्लस या योजनेचा फायदा ग्राहकांनी घ्यावा व दहा महिन्यानंतर मजुरीवर पन्नास टक्के इतका डिस्काउंट ग्राहकांना मिळणार असल्याचे मत चंदुकाका सराफ सुवर्णपेढीचे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी सांगितले. तसेच विवाह तस्मै या महोत्सवाच्या माध्यमातून सध्या सोने दागिन्यांच्या खरेदीवर एक तोळ्याला २५०० पर्यंत इतकी रक्कम डिस्काउंट म्हणून देण्यात येणार असल्याचेही मत श्री. किशोरकुमार शहा यांनी केले.
0 Comments