Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute नातेपुते-पिरळे रोडच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; विनायक सावंत यांचे २ जूनपासून आमरण उपोषण


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते - पिरळे रोडच्या अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विनायक सावंत यांनी २ जून २०२५ पासून नातेपुते येथील पालखी मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

सावंत यांनी सांगितले की, संबंधित रस्त्याच्या कामासाठी ई-टेंडरनुसार वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, ठरलेल्या कालावधीत काम पूर्ण झाले नाही आणि आजही काम अर्धवट स्थितीत आहे. पावसाळा जवळ येऊनही अर्धवट कामे तशीच राहिल्यामुळे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

त्यांनी पुढील तीन मुख्य मागण्या मांडल्या आहेत:
१. कामाच्या विलंबाबाबत ठेकेदारावर शासकीय कारवाई: वर्क ऑर्डरनुसार काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी.
२. अर्धवट कामांमुळे झालेल्या नुकसानीची जबाबदारी: खराब झालेला रस्ता पुन्हा नव्याने तयार करावा व त्याचा संपूर्ण खर्च संबंधित ठेकेदाराच्या बीलातून वसूल करण्यात यावा.
३. ठराविक कालावधीत काम न करणाऱ्या ठेकेदारांना बील मंजूर न करणे: अशा ठेकेदारांना कोणत्याही प्रकारचे बील मंजूर करू नये, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांची पूर्तता न झाल्यास २ जूनपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा ठाम इशारा सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

Post a Comment

0 Comments