महादरबार न्यूज नेटवर्क - छत्रपती शिवाजी महाराज राजयाभिषेक सोहळा संस्थेत जल्लोषात साजरा; मुख्यमंत्री फडणवीस यांचा व्हिडिओ संदेश दिला हुतात्मा गोविंदराव पानसरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद जिल्हा नांदेड येथे दिनांक ६/६/२०२५ रोजी महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा भव्य कार्यक्रम उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व शिवाजी महाराजांचे नेतृत्व, प्रशासन आणि राष्ट्रहितासाठीचे कार्य यावर भाष्य केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य त्रिचूरकर साहेब आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संगीता चिंतावर मॅडम व प्रमुख वक्ते मालू सर यांची उपस्थिती लाभली. त्यांनी शिवाजी महाराजांचे इतिहासातील स्थान, त्यांच्या दूरदृष्टीचे महत्त्व आणि तरुण पिढीला मिळणारी प्रेरणा आणि नागरी कर्तव्य व शिष्टाचार या विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आली. प्राचार्य त्रिचूरकर साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप केले व विद्यार्थ्यांना इतिहासातून प्रेरणा घेऊन देशसेवा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंडकर सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार शिंदे सर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्धरीत्या व प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
0 Comments