महादरबार न्यूज नेटवर्क -
सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नाने तब्बल पंधरा वर्षानंतर पिरळे ता.माळशिरस येथे एस टी बस सुरू झाल्याने पिरळे येथील नागरिकांनी आनंद उत्सव साजरा केला.
अनेक वर्षापासून बंद असलेली नातेपुते- पिरळे- बांगार्डे मुक्कामी एस.टी बस पत्रकार प्रमोद शिंदे यांच्या प्रयत्नाने सुरू झाली.सकाळी पावणे सात वाजता बांगार्डे- पिरळे- नातेपुते एस.टी बसचे आगमन होताच पिरळे येथे नागरिकांनी हलगी फटाके वाजवत जल्लोष करत एसटीचे चे स्वागत केले.ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते एस.टी बस चे उद्घाटन करण्यात आले. पिरळे गावचे माजी सरपंच उद्योजक संदीप नरोळे यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा देत गावातील २५ प्रवाशांचे स्वतः बसचे तिकीट काढून नातेपुते येथे हॉटेलमध्ये जेवण,चहा,नाश्त्याची सोय केली २५ प्रवाशांनी पहिल्याच दिवशी बस प्रवासाचा आनंद घेतला.
नातेपुते एस.टी स्टँडवर प्रसिद्ध उद्योजक प्रमोद शेठ डूड्डू यांनी प्रत्येक नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सत्कार करत एस.टी स्टँड मधील प्रवाशांना पेढे वाटले. ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच अमोल शिंदे यांनी ग्रामस्थांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला तसेच वाहक विजय एकतपुरे,चालक अशोक साळुंखे व पत्रकार प्रमोद शिंदे यांचा फेटा बांधून सत्कार केला.हॉटेलचे मालक मामासाहेब लवटे यांनी सर्व प्रवाशांना मोफत चहा दिला तसेच येणाऱ्या प्रत्येक एस.टी कंडक्टर व ड्रायव्हर यांना मोफत चहा नाश्त्याची सोय कायमस्वरूपी केली आहे. अजिंक्य हेअर स्टाईल चे मालक अजिंक्य भारत खंडागळे यांनी चालक व वाहक यांची कायमस्वरूपी मोफत कटिंग दाढी करून देण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी ,उत्तम कदम सर, प्रमोद शिंदे यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या व नातेपुते- वालचंदनगर बस पिरळे मार्गे जाण्याची मागणी केली आहे जेणेकरून विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सोय होईल.याप्रसंगी सरपंच अमोल शिंदे, ज्ञानदेव शिंदे, संदीप नरोळे,तानाजी दडस, नारायण वाघमोडे, महादेव होळकर, भारत पवार, दत्तात्रेय लवटे, दादासाहेब ठवरे, गोरख साळवे, सचिन किर्दक,बाळासाहेब शिंदे,कांतीलाल माने, सुदाम बुधावले, बाबासाहेब खंडागळे, हनुमंत बुधावले, सचिन खिलारे, महादेव रणदिवे, गणपत बुधावले,अनिल वाघमोडे,धनंजय साळवे, संग्राम खिलारे, शंकर साळवे,महादेव बल्लाळ,चव्हाण सिस्टर,अनिल खिलारे, महादेव किर्दक, सुभाष किर्दक, हरिभाऊ लवटे, रघुनाथ दडस, श्रीराम खंडागळे,प्रती कांबळे ,पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी सुरू होण्या संदर्भात अकलूज आगार प्रमुख प्रमोद शिंदे व नातेपुते कंट्रोलर राजेंद्र पवार यांनी विशेष सहकार्य केले.
0 Comments