Hot Posts

6/recent/ticker-posts

#Alandi सीमेवरील सैनिकांसाठी राज्यातील विविध भागातून पाठवल्या राख्या

       एक धागा शौर्याचा


महादरबार न्यूज नेटवर्क -
"एक राखी सैनिकांच्या सन्मानासाठी" हा उपक्रम दिनांक २१ ते  २८ जुलै या दरम्यात राबवण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी एकत्रितपणे रक्षाबंधन हा सण देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सीमेवरील जवानांसोबत साजरा करण्याचे ठरवले आहे.


यासाठी जमा केलेल्या रक्कमेमधून जम्मू आणि काश्मिर, कारगिल, बालाघाट, पठाणकोट, श्रीनगर, उत्तर प्रदेश व अरुणाचल प्रदेश येथील सीमेवरील जवानांसाठी ४०० हून अधिक राख्या स्पीड पोस्टद्वारे पाठवल्या. भारतात साजरा होणाऱ्या विविध सण उत्सवात आपल्या सीमेवरील सैनिकांना सहभागी होता येत नाही. सैनिक निस्वार्थपणे आपल्या परिवाराची काळजी न करता देशहितासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून सदैव तत्पर असतात. म्हणून महाराष्ट्रातील तरुण-तरुणींनी रक्षाबंधन हा सण सैनिकांच्या या निस्वार्थ सेवेला सन्मान देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांच्यासोबत करण्याचे ठरवले आहे.

या उपक्रमात  स्वरूपा कुंभार, ऐश्वर्या तूम्मोड, उषा तुम्मोड, श्रुती माळी, स्नेहल भोसले, राजाबाई सूर्यवंशी, सरस्वस्ती कोळगे, वैष्णवी शिंदे, ऐश्वर्या राजपूत, कोमल पाटील, रोहिणी माने, मंगला चौधरी, मयुरी पाटील, मंजुळा औरादे, कल्याणी पाटील, द्रोपती डावखरे, वैष्णवी शहाणे, योगिनी महाजन, आरती कळसकर, श्रद्धा जाधव, नक्षत्रा रुपेश लोणकर, गोरख नझिरकर, शिवराज पाटील, प्रशांत नवले, शिवांश शहाणे, वैभव पांडे, श्रीकांत माने, मयूर मोरे, नितीन चव्हाण, सुरेश कुमार, निखिल कंकर, लक्ष्मण पवार, राहुल गायकवाड, बलराम राजले, सुरज खाटमोडे, संदीप कांबळे, प्रकाश कुंभार, यश कुमावत, प्रवीण  पोखरणेकर, आर्वीक मार्कवाड, रोहीत ठाकूर, मयूर शिरापुरे, लक्ष्मण करपुरे, विनोद गावडे, जगन्नाथ सूर्यवंशी, अविनाश कोळगे आदींचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments