Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची येथील विद्यार्थिनींनी पोलिसांना राखी बांधून दिला समाजरक्षणाचा संदेश


महादरबार न्यूज नेटवर्क -
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, मोरोची ता.माळशिरस येथील विद्यार्थिनींनी  नातेपुते पोलीस ठाण्यातील पोलिसांना स्वतः तयार केलेल्या राख्या बांधून समाजरक्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


विद्यार्थ्यांचा हा अभिनव उपक्रम समाजातील पोलिसांप्रती आदरभावना व्यक्त करणारा ठरला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक . महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक धनाजी ओमासे, पो. कॉ. अमोल देशमुख यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पोलीस स्टेशनची कार्यप्रणाली प्रत्यक्ष दाखवली आणि सामाजिक सुरक्षेचे महत्व समजावले.

शाळेचे वरिष्ठ शिक्षक समीर पठाण, सुनंदा पवार , दीपक कुंभार , गणेश खोमणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय, विद्यार्थ्यांनी सीमेवरील सैनिकांसाठीही विशेष राख्या तयार करून पोस्टाद्वारे पाठवल्या.

मुख्याध्यापक लक्ष्मण पाटील आणि उपमुख्याध्यापक जिलानी आतार यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले, “अशा कृतीतून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, समाजप्रेम व जबाबदारीची भावना घट्ट होते.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख दीपक कुंभार यांनी तर सूत्रसंचालन अलका शिंदे  यांनी केले. संपूर्ण उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखी बांधत बंधुभाव वृद्धिंगत केला आहे.                   
       

Post a Comment

0 Comments