Hot Posts

6/recent/ticker-posts

#Alandi रविवारी भोजलिंग काका विश्वस्त मंडळाचा अखंड हरिनाम सप्ताह. तीस वर्षाची परंपरा कायम


महादरबार न्यूज नेटवर्क -
येथील श्री संत भोजलिंग काका समाधी मंदिर सेवा विश्वस्त मंडळ आळंदी देवाची आयोजित विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्थेचे रविवारी  अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रदीप गरुड यांनी सांगितले. रविवार दि.१८/८/२०२५ ते रविवार दि. २४/८/२०२५ या कालावधीत दररोज दुपारी तीन ते चार प्रवचन, सायंकाळी साडेसहा ते साडेआठ किर्तन, दररोज दुपारी एक ते तीन संगीत भजन. दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ७ ते ११ ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण दुपारी एक ते तीन महाप्रसाद तदनंतर संगीत भजन, प्रवचन, हरिपाठ व हरिकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये नामांकित कीर्तनकार प्रवचनकार यांची सेवा होणार आहे तसेच रविवार दिनांक २४/८/२०२५  रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत शांतीब्रह्म  ह. भ. प. मारुती महाराज कुऱ्हेकर  यांचे काल्याचे किर्तन होईल. असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments