महादरबार न्यूज नेटवर्क - वडघर ता.राजगड येथील जुन्या पिढीतील आजी ठकुबाई विठ्ठल डोईफोडे यांचे वयाच्या १२५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात ३ मुले नागू विठ्ठल डोईफोडे , धाकू विठ्ठल डोईफोडे,कोंडीबा विठ्ठल डोईफोडे, रामभाऊ भागुजी डोईफोडे नातु,विठ्ठल धोंडिबा ढेबे जावई आहेत तर १५ नातवंडं,४५ परंतुडे, १३दुतुंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.वडघर गावच्या सरपंच सुवर्णा नथुराम डोईफोडे यांच्या त्या आजे सासू होत.तर ऑल इंडिया धनगर महासंघाचे युवक जिल्हाअध्यक्ष नथूराम डोईफोडे यांच्या आजी होत.
0 Comments