Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras तरंगफळ येथे धानुका कृषी मित्र चर्चासत्र उत्साहात संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क -
धानुका ॲग्री टेक लिमिटेड यांच्या माध्यमातून धानुका कृषी मित्र चर्चासत्र तरंगफळ येथे मोठ्या उत्साहात पार पडले. परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी धानुका कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तरंगफळ गावात येऊन शेतकऱ्यांबरोबर संवाद साधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनीही मोठ्या उत्साहात अनेक प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. तरंगफळ परिसरातील शेतकरी कृषी क्षेत्रात स्वतः कष्ट करून ऊस, केळी, द्राक्ष ,मका अशा पिकांमध्ये भरघोस उत्पन्न काढत असून त्यांना तांत्रिकदृष्ट्या आणि नवीन प्रॉडक्टची माहिती देण्यासाठी चर्चासत्राची गरज होती ती ओळखून धानुका ॲग्री टेक कंपनीने आयोजन केले होते.
यावेळी मका प्लॉटवर जाऊन माहिती देण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी श्री सुशांत भुंजे डीजीएम, श्री असलम ओलांडकर एसएमई , श्री संदीप बनसोडे एएसएम, शुभार्थी मिश्रा प्रॉडक्ट मॅनेजर, दीपक वाघमोडे एस एफ एल, तरंगफळ चे सरपंच श्री नारायण तात्या तरंगे, बीज उत्पादक संस्थेचे व्हाईस चेअरमन माजी सरपंच श्री सुजित तरंगे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष प्रगतशील बागायतदार गोरख जानकर, धनाजी शिकारे, विलास तरंगे यांचे सह अधिकारी, शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments