महादरबार न्यूज नेटवर्क -
भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढेवस्ती (कारूंडे) शाळेत उस्फूर्तपणे साजरा
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय थोरात ,तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण काटे व स्वप्नजीत पवार हे होते. व्यासपीठावर, जगन्नाथ लोंढे बापू, सुरेश लोंढे नाना, स्वप्नजीत पवार ,लक्ष्मण काटे,अनंता साळुंखे गोसावी सर ,गणेश कांबळे, आबा मस्कर ,गोसावी साहेब माजी सचिव मंत्रालय मुंबई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुंडोपंत सलगर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीतानंतर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री लोंढे सर यांनी केले. यावर्षी प्रथमच संगीतमय कवायत कार्यक्रमात घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय थोरात, लक्ष्मण काटे ,स्वप्नजीत पवार, पत्रकार हनुमंत माने ,गोसावी साहेब ,गोसावी सर ,गणेश कांबळे ,आबा मस्कर ,शाळा व्यवस्थापन समितीचे नवनियुक्त अध्यक्ष गुंडोपंत सलगर ,माजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगनाथ लोंढे बापू यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांमध्ये मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत धर्मपुरी केंद्रात तिसरा क्रमांक मिळवलेला इयत्ता तिसरीतील विद्यार्थी श्रीहर्ष हनुमंत माने याचा शाळेच्या वतीने लेखणी पॅड,कंपास, श्रीफळ, हार, गुलाब फुल देऊन पालकासह सत्कार करण्यात आला.
सर्वजण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते तो सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये माझ्या या दारातून, आय लव माय इंडिया, देशभक्तीपर गीत हम लोगों को ,या तिन्ही गीते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.पालकांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळाला. या तिन्ही गीताचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेखपणे केले. पालकांनीही त्यास उत्तम प्रकारे प्रतिसाद देऊन तीन हजार रुपये पर्यंत बक्षिसांचा वर्षाव केला.
त्याचबरोबर पालकांचे मनोगत यामध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीचे सदस्य सुरेश लोंढे नाना यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी शाळेची गुणवत्ता व अडीअडचणी बाबत आपले मत व्यक्त केले . शाळेला कोण कोणत्या गोष्टीची कमतरता आहे ,याचा उल्लेख लोंढे नाना यांनी आपल्या भाषणात केला आणि त्यांच्या भाषणाला प्रतिसाद देत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय थोरात यांनी शाळेसाठी ५०००/- रुपयाची देणगी दिली . त्याचबरोबर गोसावी साहेब माजी सचिव मंत्रालय मुंबई ५०००/-,श्रीनाथ देवस्थान (पवार शेटजी) ५०००/-रुपये अशा प्रकारची देणगी शाळेसाठी देण्यात आली.
स्पोर्ट ड्रेस साठी खालीलप्रमाणे पालकांनी योगदान दिले.
स्वप्नजीत पवार दहा ड्रेस
हनुमंत कोरटकर पाच ड्रेस
गुंडोपंत सलगर दहा ड्रेस
लोंढे सर पाच ड्रेस
श्रीमती निकम मॅडम पाच ड्रेस
संदीप जोशी एक हजार रुपये.
अशाप्रकारे ४० ड्रेस विद्यार्थ्यांना पालकांच्या देणगी मधून विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस देण्यात आले.
कैलासवासी सुनील लोंढे भाऊ यांच्या स्मरणार्थ जगन्नाथ लोंढे बापू यांच्यातर्फे ४० वह्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. आजच्या कार्यक्रमासाठी वस्तीवरील पालक व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्रीमती निकम मॅडम यांनी मानले.
0 Comments