महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजने’ अंतर्गत चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील ३० अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ बनविण्यासाठी तब्बल ₹ ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे.
या निर्णयामुळे ग्रामीण भागातील बालकांना आधुनिक, सुरक्षित आणि शिक्षणास पोषक वातावरण मिळणार आहे. डिजिटल शिक्षण साधने, आकर्षक शिक्षण सामग्री, स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधा या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणार आहेत.
या योजनेचा पाठपुरावा आमदार शेखर निकम यांनी सातत्याने केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा निधी मिळवण्यात यश आले आहे. या उपक्रमामुळे चिपळूण-संगमेश्वर परिसरातील लहान मुलांच्या शैक्षणिक पाया अधिक मजबूत होणार आहे.
आमदार निकम म्हणाले,
“स्मार्ट अंगणवाडी म्हणजे केवळ इमारत नव्हे, तर बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक गुंतवणूक आहे. प्रत्येक गावातील मुलांना चांगल्या वातावरणात शिक्षण मिळावे, हीच आमची भूमिका आहे.
0 Comments