“राजकारण नव्हे, जनसेवा करणे हेच माझं ब्रीदवाक्य.” — आमदार शेखर निकम
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
शब्द देणे म्हणजे फक्त आश्वासन नव्हे, तर जनतेच्या विश्वासाची जबाबदारी उचलणे होय! आणि हीच जबाबदारी ज्या तळमळीने पार पाडली जाते, त्यालाच नेतृत्व आणि कार्यतत्परता म्हणतात — हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी.
देवरूख मशिद ते चोरप-या रस्ता हा गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हनिफशेठ हरचिकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने २२ सप्टेंबर रोजी मिटींग घेतली होती. त्या वेळी आमदारांनी “दिवाळीपूर्वी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला जाईल” असा ठाम शब्द दिला होता — आणि तो शब्द पाळत त्यांनी रु. ६५ लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे.
फक्त रस्ताच नव्हे तर देवरूख शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रश्न सुद्धा आमदारांनी तातडीने सोडवला आहे. या उपक्रमासाठी रु. ३३ लाखांचा निधी त्यांनी मंजूर करून आणला आहे.
या दोन्ही महत्त्वाच्या कामांसाठी निधी “नागरी सेवा व सुविधा पुरविणे” या योजनेतून प्राप्त करण्यात आला आहे. यामुळे देवरूख शहराचा विकास आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींना नवे बळ मिळणार आहे.
आमदार शेखर निकम यांनी यावेळी सांगितले की, “देवरूख, चिपळूण आणि संपूर्ण संगमेश्वर मतदारसंघातील उर्वरित प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील.”
जनतेच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून, दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आमदार शेखर निकम यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की —
“नेतृत्व म्हणजे केवळ बोलणे नव्हे, तर कार्यातून विश्वास जिंकणे होय!
0 Comments