Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun ग्रामपंचायत नांदिवसे नूतन इमारतीचे उदघाटन आमदार शेखर निकम व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
गावाच्या विकासासाठीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत, नांदिवसे येथील निर्मल ग्रुप ग्रामपंचायतच्या नूतन इमारतीचे भव्य उदघाटन समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. या विशेष प्रसंगी आमदर शेखर निकम तसेच माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार शेखर निकम म्हणाले, "ग्रामपंचायत ही ग्रामीण भागातील विकासाचा केंद्रबिंदू असून, नूतन इमारतीमुळे गावकारभार अधिक सक्षम आणि पारदर्शक होईल. या ठिकाणी ग्रामस्थांसाठी उत्तम सुविधा निर्माण होतील आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यात वेग येईल. मी शब्द दिला आणि सहा महिन्याच्या आत कार्यालय झाले यातही समाधान असल्याचे बोलले. २०२१ च्या अतिवृष्टीच्या गावात अनेक ठिकाणी नुकसानी झाल्या पूल वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला त्या नंतर पुलाचे काम मजूर करून उदघाटन झाले तो क्षण आज हि लक्षात आहे. आमदारकीच्या काळात अनेक विकासकामे करण्याची संधी मिळाली त्यामध्ये प्रसिद्ध कालभैरव मंदिराचे रस्त्याचे काम सुद्धा महत्वाचे होते.
माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना गावात अनेक कामे केल्याचे देखील सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नांदिवसे गावाच्या प्रगतीच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या आणि ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीसाठी केलेल्या सहकार्याचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रम एकतेचा, सहभागाचा आणि विकासाच्या नव्या पर्वाचा प्रतीक ठरला. सरपंच, उपसरपंच आदी नि शुभेच्या दिल्या.

आमदार शेखर निकम सर,माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब, अशोकभाई कदम, निहार कोवळे, दिनेश शिंदे, सरपंच सायली शिंदे, उपतालुका प्रमुख संजय गणवे ज्येष्ठ नागरिक जयवंत राव शिंदे. रमेश शिंदे, भरातराव शिंदे, रमेश शिंदे, दयानंद शिंदे, नीता पाड्याळ, नरसिंगराव शिंदे, शशिकांत शिंदे, शंकरराव शिंदे, प्रकाश शिंदे, श्रीकांत शिंदे, सुनील शिंदे, वैदही शिंदे, अशोक कदम, अनिकेत शिंदे, वैशाली मोडक, सरकारी कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments