महादरबार न्यूज नेटवर्क - संपूर्ण भारत देशा मध्ये भारतातील प्रमुख हिंदु, जैन, विरशैव आणि शिख या धर्मामध्ये दीपावली हा सण प्रामुख्याने महत्वाचा मानला जातो आणि साजरा केला जातो. दीपावली हा सण सर्व सणाच महाराजा आहे. खरीप पिकांची काढणी होऊन रब्बी पिकाच्या पेरणीपुर्वीच्या काळात हा सण साजरा केला जातो म्हणून हा सण तसा शेतकऱ्यांचा आहे.
मात्र, या वर्षी अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाच्या परिस्थितीत सर्वसामन्य शेतकरी हा कोलमडून पडला आहे. जिथे शेतकरीच आर्थिक हालाकीने गंजला आहे तर त्याच्या वर अवलंबून असलेल्या कष्टकरी कामगार वर्गाची काय कथा.? तेंव्हा आर्थिक विवंचनाग्रस्त व्यक्तींना हा दिवाळी सण साजरा करताना थोड्याशा मदतीचा हात द्यावा म्हणून नातेपुते या शहरात अण्णा सेना प्रतिष्ठाण च्या वतीने अण्णा सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक- अध्यक्ष मा. श्री अमित भिंगारदिवे यांच्या हस्ते गोरगरीबातील गरजू व्यक्तींना फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मा.इरफान नदाफ, मा. तोहित शेय, मा. अतुल बापू पवार पाटील, मा. रितेश भैय्या साळवे (उद्योजक),मा. दादासाहेब चव्हाण ( उप सरपंच कण्हेर ग्रा.पं.) मा. कैतास बोराटे, मा. पै. उमर नदाफ, मा. बबन कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजूंना फराळ वाटप करण्यात आला.
0 Comments