महादरबार न्यूज नेटवर्क -
शिवप्रसाद उद्योग समुहाच्या चेअरमन तथा मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे व मान्यवरांच्या हस्ते महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
दि. १४ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत शिबिर ग्रामपंचायत लोणंद, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणी पार पडले.
या मोफत आरोग्य शिबिरामध्ये
मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी) , मोफत यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट) ,
मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना), मोफत कॅन्सर तपासणी, मोफत रक्त तपासणी, मेंदूचे आजार तपासणी व मोफत शस्त्रक्रिया , मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया, अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया
वरील आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या, यावेळी या शिबिराचा ४९० नागरिकांनी लाभ घेतला. तसेच मोठ्या प्रमाणात मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
सेवासदन मल्टी स्पेशालिस्ट यांच्यातर्फे सौ.लताताई मोरे यांनी कामकाज पाहिले तसेच ऑपरेशनची तपासणी केली.
यावेळी मा.जि.प.सदस्या सौ.ऋतुजाताई शरद मोरे,
डॉ.लताताई मोरे, डॉ.दिपाली देसाई,
सौ.वनिता खंदारे (सरपंच), प्रियंका नीटवे (सरपंच नीटवेवाडी), श्री. मानसिंग मोहिते (मा. पंचायत समिती सदस्य), श्री. हनुमंत रुपनवर, धनाजी इंगळे, वैभव शिंदे, अशोक पवार, धनाजी खुडे, अंकुश राऊत, अनिल रुपनवर, रमेश फुले, महादेव रुपणवर, ज्ञानदेव मोहिते, बाळासो गाडे, बापूराव नीटवे, अनिता खुडे, ज्ञानदेव ननवरे, सुशांत पाटील, कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, सेवासदन हॉस्पिटल डॉक्टर व कर्मचारी, शिवप्रसाद फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments