Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute खेळाडू यांनी केलेली मेहनत, सराव हेच त्यांचे खरे पदक - महारुद्र परजणे

महादरबार न्यूज नेटवर्क -
आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी उत्साहाचा, जिद्दीचा आणि आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्याचा आहे. खेळ आपल्याला फक्त धावायला किंवा उड्या मारायला शिकवत नाही तर ते आपल्याला आयुष्य जगायला,पडल्यावर पुन्हा उठायला व जिंकल्यावर अहंकारी न होता पराभवाला कसे सामोरे जायला शिकवितो.खेळा, जिंका, पण खेळाडू म्हणून एकमेकांचा आदर करा.खेळाडू यांनी केलेली मेहनत, सराव हेच त्यांचे खरे पदक असल्याचे मत नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी व्यक्त केले.ते नातेपुते येथील एस. एन. डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलमध्ये  घेण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते पुढे बोलत असताना म्हणाले की, शिक्षणाचा अंतिम केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थ्यांचा मानसिक व शारीरिक विकास आपल्या आवडीनुसार खेळामध्ये सहभाग घ्या तुमच्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घ्या खेळामुळे जीवनाला शिस्त लागत असल्याचे प्रतिपादन सपोनी महारुद्र परजणे यांनी व्यक्त केले.

यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख, सेक्रेटरी रोहित शेटे, अक्षय लोंढे, प्राचार्य संदीप पानसरे, उप प्राचार्य शकूर पटेल, संस्थेचे पीआरओ मनोज राऊत उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. बुधवार दिनांक १९ ते मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर पर्यंत क्रीडा सप्ताह सुरू असणार असून प्री - प्रायमरी विभागप्रमुख निलम ढोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षिका यांनी क्रीडा स्पर्धेबाबत योग्य नियोजन करून क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. क्रीडा स्पर्धेचे प्रास्ताविक प्राचार्य संदीप पानसरे यांनी केले असून आभार शकूर पटेल यांनी माणले.

मुलांच्या जीवनामध्ये जसे अभ्यासाला महत्त्व आहे तेवढेच महत्त्व शारीरिक व्यायाम व खेळाला या एस. एन. डी. शाळेत दिले जाते. खेळ म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर ते आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. क्रीडा स्पर्धेमुळे सांघिक भावना, शिस्त, दृढनिश्चय या गुणांमुळेच आपण जीवनातील कोणतेही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.
मालोजीराजे देशमुख
( चेअरमन एस.एन.डी. स्कूल नातेपुते )

Post a Comment

0 Comments