#Yavat:यवत येथील पी. एम. पी.एल बस स्टॉप भर उन्हात
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
पुणे सोलापुर महामार्गावरील यवत ते हडपसर. सासवड. पुणे शहर देहू आळंदी पर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना यवत येथे बस स्थानकावर भर उन्हात उभे राहुन उन्हाचे चटके सहन करतात.तर दुसरीकडे दैनिक पास ७० रुपये व मासिक.पास १४००.रु. चे पास बंद केले आहे दि.०१/०४/२०२२. पासुन बंद करण्याचा निर्णय घेऊन तिकिट दरात कि.मी. प्रमाणे वाढ करण्यात आली आहे.
यवत येथून हडपसर, पुणे शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांना बस थांब्यावर सावली करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रवाशांना उन्हात थांबावे लागत आहे. यवत, खोर खुटबाब, भांडगाव, उंडवडी व यवत परिसरातील प्रवासी नोकरी उद्योग व्यवसायासह इतर विविध कामांसाठी पुणे शहराकडे पी.एम.पी.एल. बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यां मुलांची संख्या देखील अधिक आहे. यवत येथे पी एम पी एल बस स्टॉपवर सतत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे यवत येथून दररोज जास्त प्रवाशांची वाहतूक होते . त्यामुळे बसथांब्या जवळ प्रवाशांची गर्दी दिसून येते. या ठिकाणी पिण्याचे पाणी ची सोय व्हायला हवी असे प्रवासी वर्गाकडून मागणी होत आहे इतर नाहक गाड्या कडून त्रास बसगाडी वळविण्यासाठी चालकांना होतो.
सावलीचा निवारा नसल्याने प्रवाशी बसच्या प्रतीक्षेत आजू बाजूला निवारा मिळेल त्याठिकाणी थांबतात आत्ता कडक उन्हाच्या झळा आहेत लहान मुले, महिला व वयोवृद्ध प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी निवारा उभारावा,व अजून प्रवासी सुविधा मिळाव्यात अशी मागणी नागरिक व प्रवासी वर्गातून होत आहे.
Comments
Post a Comment