#Natepute:धर्मपुरी केंद्र शाळेत गुडी पाडवा-पट वाढवा मोहीमेअंतर्गत प्रवेशोत्सवाचे आयोजन..

               

महादरबार न्यूज नेटवर्क - विवेक खरात
गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर केंद्र शाळा धर्मपुरी येथे सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या साठी प्रवेशोत्सवाचे आयोजन केले होते.                                                नुकतेच शासनाने इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शाळापूर्व तयारी चा सर्व शिक्षकांचा मेळावा घेऊन पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी चांगली व्हावी या हेतूने   सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविका यांना  प्रशिक्षण दिले होते.   या नियोजनबद्ध प्रशिक्षणाचे आयोजनही धर्मपुरी केंद्रात चांगले झाल्याचे दिसले.  

गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर आपण गुडी उभारुन हा सण  साजरा करतो,शाळेत दाखल होणाऱ्या चिमुकल्या बालकांच्या आयुष्याच्या दृष्टीने त्यांना शाळेत दाखल करुन त्यांच्या शैक्षणिक प्रगती ची गुडी उभारण्याचा कार्यक्रम   या मुहूर्तावर शाळेत  अतिशय उत्साहात  पार पडला.                                                 

या प्रवेशोत्सवात ६ वर्ष पूर्ण असणाऱ्या १६ बालकांनी पहिल्याच दिवशी प्रवेश घेतला.त्यांचे सोबत त्यांचे माता पालक उपस्थित होते.सर्वच बालकांचे या शाळेतील महिला शिक्षिकांनी औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प, शैक्षणिक साहित्य तसेच खाऊ आणि फुगे देऊन स्वागत केले.सर्व बालकांची हालगीच्या तालात मिरवणूक काढली.             

या प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक  झेंडे सर , ढोबळे सर, मदने सर, कोळी सर तसेच श्रीम कुलकर्णी मॅडम, श्रीमती अर्चना पाटील मॅडम, पवार मॅडम, गायकवाड मॅडम तसेच माता पालक यांनी बालकांचे स्वागत केले.गेल्या वर्षी कोव्हिड १९ मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती मध्ये अनेक अडचणी आल्याने  येणा-या शैक्षणिक वर्षाची सुरुवात पाडव्याच्या मुहूर्तावर चांगली झाली.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम