#Chiplun:चिपळूणमधील दोन गावांना ६५ वर्षांनी महाजनकोकडून मुबलक पाणी मिळणार



आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून बाबू साळवी यांच्या प्रयत्नांना यश

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
तालुक्यातील पोफळी सय्यदवाडी व कोंडफणसवणे या दोन गावांच्या पाण्याचा प्रश्न महाजनकोच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत सुटला आहे. हा प्रश्न  आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे युवा नेते व पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांच्यासह या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. यामुळे या दोन गावांना आता ६५ वर्षांनी मुबलक पाणी मिळणार असल्याने येथील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
पोफळी सय्यदवाडी व कोंडफणसवणे या दोन गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. कोयना प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर प्रकल्प बाधित गावांना महाजनकोकडून पाणी मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. मात्र, हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. यामध्ये आमदार शेखर निकम व राष्ट्रवादीचे युवा नेते पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांनी लक्ष घातले. इतकेच नव्हे तर महाजनकोकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.  यानुसार आमदार निकम यांच्या पुढाकाराने नुकतीच पोफळी येथे महाजनकोच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत महाजनकोच्या अधिकाऱ्यांनी पोफळी येथील साठवन टाकीमधून पोफळी सय्यदवाडी व कोंडफणसवणे या दोन गावांना ग्रॅव्हिटीने पाणी देण्याची ग्वाही दिली. यामुळे या गावातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

या बैठकीच्यावेळी आमदार शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते दादा साळवी, तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, संजय मानकर, संजय बामणे, पोफळीचे माजी उपसरपंच अब्दुल्ला सय्यद, इब्राहिम सय्यद, उस्मान सय्यद, किसन पवार, चंद्रकांत पवार, शिवाजी पवार, कोंडफनसवणे सरपंच झिनगरे, उपसरपंच  शिगवण, आप्पा इंदुलकर, श्याम कदम, तसेच महाजनकोचे मुख्य कार्यकारी अभियंता चोपडे, कुंभार, रेकटे, चव्हाण आदी उपस्थित होते.
      
पोकळी सय्यदवाडी व कोंडाफणसवणे या दोन गावातील पाण्याचा प्रश्न सुटल्याने येथील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम व पंचायत समिती सदस्य बाबू साळवी तसेच महाजनकोच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम