Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:नातेपुते येथे पत्रकारांच्या वतीने पेपर विक्रेत्यांचा सन्मान

महादरबार न्यूज नेटवर्क -
ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपल्या व्यवसायिक कार्यास प्राधान्य देऊन नागरिकांना रोज जगात चाललेल्य घडामोडीची व सामाजिक राजकीय आध्यामिक  वर्तमानाची माहिती मिळणाऱ्या वृत्तमानपत्राची विक्री करणाऱ्या नातेपुते येथील सुरेश दळवी, सागर पोटे, संतोष दळवी, संकेत दळवी, ज्ञानेश्वर भांड, पिंटू खोले, लक्ष्मण सोनवळ या पेपर विक्रेत्यांचा नातेपुते येथील गणेश मंदिरात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी नातेपुते येथील पत्रकारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी पत्रकार श्रीकांत बाविस्कर, अभिमन्यू आठवले,विलास भोसले, मनोज राऊत,उमेश पोतदार, प्रमोद शिंदे, श्रीराम भगत महाराज, अमित सोरटे, हनुमंत माने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments